
Dr Chetan Deshmukh
Chemotherapy Diet
किमोथेरपीनंतर :काय खावे :
आहार /रोजचे जेवण हा आपल्या जीवनाचा फार महत्वाचा भाग आहे . भारतासारख्या वैविध्यपूर्ण देशात तर खाद्यपदार्थांची रेलचेल आहे . त्यामुळे कोणत्याही आजारात 'काय खावे 'अथवा 'काय खाऊ नये ' याबद्दलचे ग्रंथ उपलब्ध आहेत . रुग्णांशी उपचारांबद्दल चर्चा करताना आहारावर खूप वेळ दिला जातो , पथ्यान्वरून साधक - बाधक चर्चा केली जाते , आहाराचे तकते दिले जातात आणि मग सुरु होते आजाराचे 'डाएट' . खाण्याचे पथ्य नसेल तर उपचारात काही 'दम ' नाही , किंबहुना खाण्यापिण्यावर बंधने घालत नाहीत ते डॉक्टरच काही खरे नव्हे असेही काहींचे मत आहे
Chemotherapy Vomiting
किमोथेरपीमुळे होणारे त्रास - उलटी मळमळ :
उलटी होणे ही शरीराची बचावात्मक क्रिया आहे . एखादी त्रासदायक गोष्ट शरीरात आली तर या उलटीच्या क्रियेला सुरवात होते . मेंदूच्या खालच्या भागात उलटीवर नियंत्रण ठेवणाऱ्या केंद्रातून उत्पन्न होणाऱ्या लहरींद्वारे जठराचे स्नायु आकुंचन पावतात, जठर आणि अन्ननलिकेची झडप उघडते आणि जठरातील पदार्थ उलट दिशेने ( म्हणजे जठराकडून अन्ननलिकेतून तोंडाच्या दिशेने ) फेकले जातात . या क्रियेलाच 'उलटी होणे ' म्हणतात . किमोथरपीच्या औषधांमुळे या उलटीच्या केंद्राला चालना मिळते आणि म्हणूनच किमोथेरपीमुळे उलट्या होतात . त्याचे तीन प्रकार आहेत.
Chemotherapy Mucositis
किमोथेरपीनंतर : तोंड येणे :
आपल्या तोंडाच्या आतील त्वचा ( ज्याला वैद्यकीय भाषेत म्युकोझा म्हणतात ) म्हणजे एक गुळगुळीत पातळसर आवरण असते . या आवरणाखाली तोंडाच्या आतील भागातील संवेदना जाणणाऱ्या चेतासंस्थेच्या नसा असतात . हे आवरण पातळ असल्याने तोंडाच्या आतील कठीण -मऊ स्पर्श , अन्नाच्या चवीतील किंवा तापमानातील बदल या नसा ओळखू शकतात . या नसांवर जर थेट अन्न किंवा पाणी पडले तर या अतिसंवेदानाक्षम नसा दुखावल्या जातात आणि अन्न खाताना किंवा पाणी पिताना दुखते यालाच तोंड येणे ( वैद्यकीय भाषेत म्युकोसायटिस ) म्हणतो .