Dr Chetan Deshmukh

Side Effects of Chemotherapy

Chemotherapy Diet

Written by Friday, 27 March 2015 18:57

किमोथेरपीनंतर :काय खावे :

आहार /रोजचे जेवण हा आपल्या जीवनाचा फार महत्वाचा भाग आहे . भारतासारख्या वैविध्यपूर्ण देशात तर खाद्यपदार्थांची रेलचेल आहे . त्यामुळे कोणत्याही आजारात 'काय खावे 'अथवा 'काय खाऊ नये ' याबद्दलचे ग्रंथ उपलब्ध आहेत . रुग्णांशी उपचारांबद्दल चर्चा करताना आहारावर खूप वेळ दिला जातो , पथ्यान्वरून साधक - बाधक चर्चा केली जाते , आहाराचे तकते दिले जातात आणि मग सुरु होते आजाराचे 'डाएट' . खाण्याचे पथ्य नसेल तर उपचारात काही 'दम ' नाही , किंबहुना खाण्यापिण्यावर बंधने घालत नाहीत ते डॉक्टरच काही खरे नव्हे असेही काहींचे मत आहे

Chemotherapy Vomiting

Written by Friday, 27 March 2015 18:57

किमोथेरपीमुळे होणारे त्रास - उलटी मळमळ :

उलटी होणे ही शरीराची बचावात्मक क्रिया आहे . एखादी त्रासदायक गोष्ट शरीरात आली तर या उलटीच्या क्रियेला सुरवात होते . मेंदूच्या खालच्या भागात उलटीवर नियंत्रण ठेवणाऱ्या केंद्रातून उत्पन्न होणाऱ्या लहरींद्वारे जठराचे स्नायु आकुंचन पावतात, जठर आणि अन्ननलिकेची झडप उघडते आणि जठरातील पदार्थ उलट दिशेने ( म्हणजे जठराकडून अन्ननलिकेतून तोंडाच्या दिशेने ) फेकले जातात . या क्रियेलाच 'उलटी होणे ' म्हणतात . किमोथरपीच्या औषधांमुळे या उलटीच्या केंद्राला चालना मिळते आणि म्हणूनच किमोथेरपीमुळे उलट्या होतात . त्याचे तीन प्रकार आहेत.

किमोथेरपीनंतर : तोंड येणे :

आपल्या तोंडाच्या आतील त्वचा ( ज्याला वैद्यकीय भाषेत म्युकोझा म्हणतात ) म्हणजे एक गुळगुळीत पातळसर आवरण असते . या आवरणाखाली तोंडाच्या आतील भागातील संवेदना जाणणाऱ्या चेतासंस्थेच्या नसा असतात . हे आवरण पातळ असल्याने तोंडाच्या आतील कठीण -मऊ स्पर्श , अन्नाच्या चवीतील किंवा तापमानातील बदल या नसा ओळखू शकतात . या नसांवर जर थेट अन्न किंवा पाणी पडले तर या अतिसंवेदानाक्षम नसा दुखावल्या जातात आणि अन्न खाताना किंवा पाणी पिताना दुखते यालाच तोंड येणे ( वैद्यकीय भाषेत म्युकोसायटिस ) म्हणतो .

किमोथेरपी नंतर : केस गळणे :

किमोथेरपिचा सर्वात अप्रिय असा दुष्परिणाम म्हणजे केस गळणे . भारतीय समाजात केस 'जाणे 'याला काही वेगळे अर्थ आहेत , त्यामुळे केस गळणे - विशेषकरून स्त्रियांचे - हा प्रकार अनेकांना नकोसा वाटतो . या त्रासापासून सुटका होण्यासाठी प्रसंगी किमोथेरपीला नकार देणारे रुग्ण असतात .

Chemotherapy Fever

Written by Friday, 27 March 2015 18:57

किमोथेरपी नंतर : ताप येणे :

रुग्णांच्या लेखी किमोथेरपीमुळे केस गळणे चिंताजनक परिणाम आहे , तसाच किमोथेरपी नंतर ताप येणे हा डॉक्टरांच्या मते चिंताजनक प्रकार आहे . किमोथेरपीची औषधे वाढणाऱ्या पेशींना मारक असतात . आपल्या शरीरातील पांढऱ्या (संरक्षक ) पेशी अतिशय वेगाने वाढतात , 

Chemotherapy Fatigue

Written by Friday, 27 March 2015 18:55

किमोथेरपी नंतर : गळून जाणे /अशक्तपणा /थकवा :

किमोथेरपी घेऊन घरी गेल्यावर बऱ्याच रुग्णांना अशक्त वाटते ,काही खावेसे वाटत नाही ,फार हालचाल करावीशी वाटत नाही . नुसते बिछान्यावर पडून रहावेसे वाटते , कोणत्याही कामासाठी उत्साह राहत नाही . खरेतर बऱ्याच रुग्णांना नुसते पडून राहण्याची सवय नसते ,

Latest Resources

 
 
Home Articles by Dr. Chetan Side Effects of Chemotherapy

Medical Oncology

Stay Healthy

Winners of Life

Dr Chetan Deshmukh Consulting at

1

Pune

1. Deshmukh Clinic & Research Center,
2. Deenanath Mangeshkar Hospital,
3. Ruby Hall Clinic, Pune, Maharashtra, India.
2

Kolhapur

Kolhapur Cancer Center, Gokul-Shirgaon MIDC, Kolhapur-Kagal Road, Kolhapur. Maharashtra, India.
3

Miraj

Mahatma Gandhi Cancer Hospital, Near Gulabrao Patil Medical College, Miraj, Maharashtra, India.